Friday 2 September 2011

पण.. कधी बोललोच नाही..

तिचे डोळे, त्यातील भाव
शांतशा सागरातील, छोटीशी नाव 
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे हसणे, तिची खळी
रोज नव्याने उगवणारी, नाजूकशी कळी
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे येणे , तिचे असणे
जणू मंद स्वरातील अलगद गाणे
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे रुसणे, तिचा राग
तिच्या लाडिक स्वभावाचा तोही लाडिकसा भाग
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

हृदयात माझिया या, चित्र तिचेची होते
हरवेन तेही, या भीतीने..
कधी  बोललोच नाही.. कधी बोललोच नाही.....   



- कवी आमोद

12 comments:

  1. Hey this is really beautiful !! Lihit jaa regularly !

    ReplyDelete
  2. अरुणा, खूप खूप धन्यवाद.. :)
    होय,लिहीत जाईनच.. तू पहिल्या ब्लॉगपोस्ट वरही हेच सांगितले होतेस ना (:)), पण आता मी खरच नियमितपणे रचना प्रकाशित करणार आहे..
    डोक्यात खूप काही येतं अन विरून जातं..
    पण भावना कुठल्या न कुठल्या माध्यमातून व्यक्त होणे महत्वाचे असते किंबहुना गरजेचे असते...

    ReplyDelete
  3. aamod kavita far chan aahe pan , ische rights to aadhi register kar,,,,, there are many plagiarists these days lookin for some beautiul poetry

    ReplyDelete
  4. मग आता बोलून टाक... नाहीतर आयुष्यभर वाईट वाटेल... ;)

    ReplyDelete
  5. एका मुलाला एका मुलीची खूप आठवण येते आहे असं दिसतंय... :P असो.... :D

    ReplyDelete
  6. कोण आहे रे ती ? आता बोलण्याची संधी आहे :)

    ReplyDelete
  7. @Satya: हाहाहा.. लईच होईल रे ते काम.. :) बाय द वे, तू सरोदेंचा सत्य कि देशमुखांचा.. ? :)

    @हर्षल : सोड रे.. जे वाईट वाटायचे होते ते वाटून गेले... कबरीवरील माती उकरून आत काही उपयोगी सापडते का.? :P B-)

    ReplyDelete
  8. @वैभवी : सोड..
    काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
    हृदयाचे दरवाजे आजि खोलणार नाही .... ;)

    ReplyDelete
  9. @आमोद ... तुला कोणीही धरलेलं नसताना "सोड" का म्हणतो आहेस? :P :D I have a suggestion for you "schrodinger's cat"... I hope you got what I meant by that...

    ReplyDelete
  10. @हर्षल : खरंय रे मित्रा .. आपण स्वतःच स्वतःला धरून ठेवलेले असते, विविध बंधनांनी बांधून ठेवलेले असते, अनामिक भीतीने घाबरवून टाकलेले असते, पण मग आपण बंधमुक्त व्हायचा प्रयत्न केल्यावर समोर येऊ घातलेल्या चांगल्या अथवा वाईट परिस्थितीला तोंड देण्यास आपण सक्षम आहोत का, हाही विचार करावा लागतो.., अन मग मन मागे कचरते.. असो...

    ReplyDelete
  11. दहा पैकी दहा!

    ReplyDelete
  12. ही पण छान कविता..
    "कबरीवरील माती उकरून आत काही उपयोगी सापडते का.?" -- क्या बात है!

    ReplyDelete