Friday 9 September 2011

चालत होतो अनवाणी मी....


आयुष्याच्या वाटेवरती
चालत होतो अनवाणी मी,
सुकलेल्या त्या झऱ्याजवळही
 मागत होतो पाणी मी...

रुक्ष किनारा शुष्कचि सगळे
भासत होते मृगजळ दुरुनी,
सुकलेल्या त्या फुलांकडूनही
मागत होतो सुगंध मी...

निपचित अशा त्या पाषाणांशी
हितगुज मनीचे केले मी,
रातराणीला पाहण्यासाठी
दिवसा जागत होतो मी...

अश्रू जरी आले हृदयातुनी 
हसुनि  पुसुनि टाके मी,
आशेच्या फुलपाखरासोबती
चालत होतो अनवाणी मी.. चालत होतो अनवाणी मी....




[Image courtesy : http://www.flickr.com/photos/jason_burmeister/ ]

8 comments:

  1. Nice.. jara marathi jad gela :P

    ReplyDelete
  2. @Omkar : Thanks re mitra..

    @Aruna: खरंच? :p

    ReplyDelete
  3. Farach chaan :))
    manachiye gunti :)

    ReplyDelete
  4. पेशवे कविता अगदी उत्तम जुळून आलीये... उत्तमच!
    फुलपाखरांसवे असेच चालत राहा आणि काव्यरंग उधळत राहा!

    ReplyDelete