आकाशात काळे ढग दाटतात,
पावसाचे थेंब मात्र स्वतःकडेच ठेवतात..
नसलेल्या त्या थेंबात भिजताना..
माहितेय, किती मिस करतो तुला..?
उनाड वारा वेगात सुटतो,
कुठूनशी पाने पळवून आणतो..
कुठूनशी पाने पळवून आणतो..
निष्पर्ण अशा वृक्षासी पाहताना...
माहितेय, किती मिस करतो तुला..?
सागरकिनारा मग चंचल होतो,
कधी जवळ, कधी दूर जातो...
किनाऱ्यासी त्या धरू जाताना...
माहितेय, किती मिस करतो तुला..?
सात समुद्रामधील हे अंतर,
एका क्षणात मी करतो पार..
तो एक क्षणही जगताना..
माहितेय, किती मिस करतो तुला..?