Friday 1 July 2011

आपले मन...
    एक अजब रसायन, एक गुंतागुंतीची रचना, प्रकाशालाही मागे टाकेल इतके वेगवान, क्षणाक्षणाला रूप बदलणारे मृगजळ... सर्वांमध्ये असताना एकटे ठेवू शकणारे आणि एकटं असतानाही सर्वांमध्ये असल्याची जाणीव देऊ शकणारे.. चांगले असले तर माणसाला देवही बनवू शकणारे अन बिघडले तर मानवातच पशू निर्माण करू शकणारे... कधी खूप गप्पा मारणारे, तर कधी 'Leave me alone' म्हणणारे.....
   या मनाचा गुंता ज्याला समजला आणि तो ज्याने सोडविला तो सुखीच म्हणायला हवा.

हेच मन कधी कधी खूप हळवं होता, याच मनाला कधी खूप खूप बोलावसं वाटतं आणि मग शोध सुरु होतो, आपल्या मनीच्या भावनांना जागा देऊ शकणार्‍या एखाद्या दुसऱ्या मनाचा, दुसऱ्या हृदयाचा.. मग ती जागा कधी आई-वडील भरून काढू शकतात, कधी मित्र-मैत्रीण तर कधी भाऊ-बहीण..... पण या सर्वांच्याही पलीकडे एक पोकळी उरून राहते, जिला भरणे खूप कठीण असते.

अशाच काही गोष्टींसाठी मनाला व्यासपीठ मिळावे, म्हणून हा ब्लॉगप्रपंच !!
वेळोवेळी सुचणाऱ्या कविता, कधी काळी मनानेच काढलेली आपली समजूत, कधी शिकविलेले तत्वज्ञान, तर कधी अशाच आपल्या गप्पा..  : )  आणि ज्या भाषेतून विचार करतो, त्यातूनच व्यक्त झालेले उत्तम, म्हणून खास मराठी भाषेची निवड : )

काही काळाने मागे वळून बघितल्यावर या सर्व गोष्टी नक्कीच मार्गदर्शन करतील असे मला वाटते..

पहिल्याच ब्लॉगचे पहिले लिखाण इथेच थांबवतो.. पण एक गोष्ट मात्र नक्की, आत्ता मारलेल्या एवढ्याशा गप्पाही माझ्या मनाला उदासीनतेतून काढून आनंद देण्यात यशस्वी झाल्यात  : D

आपलाच जवळचा मित्र,
आमोद गोखले

9 comments:

  1. Suruwaat changali aahe blog-wishwatali... keep writing regularly!

    ReplyDelete
  2. धन्यवाद मित्रा.. छान वाटले तुझ्याकडून पहिली कमेंट प्राप्त करायला.. परवा तुझाच पहिला ब्लॉग बघून आपणही ब्लॉग काढावयाच्या विचारला पुष्टी मिळाली..

    ReplyDelete
  3. Welcome to the blogging world ! :)
    Keep writing

    ReplyDelete
  4. @Aamod... hehe thanks... btw that wasnt my first blog... it was my first post on wordpress... I already have a blog which I started a year ago.. only wrote two posts... (in Marathi)... have a look at it if you are interested... http://pharshalp.blogspot.com/

    ReplyDelete
  5. पेशवे, खूपच चांगला प्रयत्न आहे. एक समीक्षा द्यावीशी वाटते. मना विषयी लिहिताना कार्यकारण भाव टाळला तर लिखाण अजून प्रभावी वाटते. अरे वा मला पण मराठी शब्द बऱ्या पैकी सुचले कि.

    ReplyDelete
  6. मस्त एकदम!! मनाचिये गुंतीची सुरुवात छान झालीय रे. हा ब्लॉग तुझ्या मनाचा आरसा होवून जावूदे. शुभेच्छा!

    ReplyDelete
  7. चांगली सुरुवात... पुलेशु !!

    ReplyDelete